Posts

स्पिती व्हॅली

Image
व्हर्चुअल टूर: 1 - स्पिती व्हॅली      साधारण शंभर वर्षांपूर्वी रुडयार्ड किपिलग या लेखकाने त्याच्या "किम" या कादंबरीमध्ये ‘जगाच्या आतील एक वेगळे जग’ व ‘जिथे स्वत: देव नांदतो’ असं म्हणत ज्या ठिकाणाचे वर्णन केलं होतं ते ठिकाण म्हणजे स्पिती व्हॅली.  तिथे राहणाऱ्या प्रख्यात लोकांचे म्हणणे आहे की किन्नौरचे राज्य मगध, मौर्य, किरता, कंबोजा, पनासिका आणि वल्हिका ह्यांनी आक्रमण करून ताब्यात घेतले होते. 9 व्या आणि 12 व्या शतका दरम्यान अगदी अल्प कालावधीसाठी, तिबेटच्या राज्याचे देखील किन्नौरमध्ये वर्चस्व होते. तेव्हा जसे होते तसेच ते आताही आहे म्हणूनच स्पितीला "परिकथेतील स्वर्ग"  असे पण म्हंटले जाते.      हिमाचल प्रदेशचा हा उत्तर- ईशान्य असा पसरलेला भाग. हिमाचल प्रदेश राज्यातील उत्तर पूर्वीय भागात कोल्ड डेझर्ट माऊंटन व्हॅली  पसरलेली आहे तीच ही किन्नौर-स्पिती व्हॅली. स्पितीचा अर्थ ‘मध्यवर्ती भूभाग’ असा होतो. पूर्वेकडील भाग हा इंडो-तिबेटला जोडत असल्याने किन्नौर स्पिती मध्ये तिबेटियन संस्कृतीचे साम्य जाणून येते. भारत आणि तिबेट सीमेवर वसलेला हा भाग त्याच्या ...